प्रतिनिधी : प्रज्ञा प्रतिष्ठान व प्रणाली सेवाभावी महीला असोसिएशन यांच्या वतीने खांबदेव नगर धारावी येथे
क्रांतिज्योती सावित्रिमाई फुले यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास माता क्रातिज्योती सावित्रिमाई यांच्या प्रतिमेस श्रीमती
सावित्रीबाई हजारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा व बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त श्रीमती गौतमी जाधव व राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार) पक्षाचे विधानसभा अध्यक्ष उल्लेश गजाकोश यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.तसेच क्रांतिज्योती सावित्रिमाई फुले जयंती दिना निमित्त संस्थेच्या वतीने लाडु वाटप करण्यात आले. माईंच्या जीवनावरील प्रकाश टाकणारी माहीती सुकेशिनी महीला बचत गटाचे सचिव अपर्णा कासारे, संस्थेचे कोषाध्यक्ष नितीन दिवेकर ,उल्लेश गजाकोश यांनी दिली.सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रकाश कदम, संजिवन जैयस्वाल,श्रीमती सुशिला सकपाळ,शोभा पिल्ले,श्रीमती जोगळे,श्रीमती फळसणकर,श्रीमती गंगुबाई शिंदे, अलिशा कासारे,कृष्णा गायकवाड,सुरेश शिदें,विनित कासारे,श्रीमती पोटे,एस.व्ही.मोहिते, आदि मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रज्ञा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे यांनी केले.