पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुणे येथे विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानातील चढ-उतार आणि ईव्हीएम घोटाळ्याबाबत उपोषण सुरू केले होते. त्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. आज शनिवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी देखील उपस्थिती दाखवली होती. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील डॉ. बाबा आढाव यांची भेट घेऊन उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे येथे जाऊन डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली आणि आपण आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. पुढील आंदोलन महाविकास आघाडी करेल असे सांगितले. डॉ. बाबा आढाव यांना पाणी पाजून सदर उपोषण सोडले.
