Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमुंबई, ठाणे, नवी मुंबईसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला NAFSCOB चा "सर्वोत्कृष्ट बँक" पुरस्कार

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला NAFSCOB चा “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार

सातारा(नितीन गायकवाड): जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक्स या संस्थेतर्फे "सर्वोत्कृष्ट बँक" म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

आज मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य समारंभात केंद्रीय गृह व सहकार मंत्री माननीय ना. अमितभाई शहा ,सहकार राज्यमंत्री मा.ना.मुरलीधर मोहोळ आणि मा श्री कृष्ण पाल यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बँकेच्या वतीने चेअरमन मा.
खासदार नितीन काका पाटील, संचालक मा.प्रदीप विधाते, मा.शिवरूपराजे खर्डेकर- निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.

पुरस्कार प्रदान प्रसंगी मा.ना.अमितभाई शहा यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगती आणि सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष कौतुक केले. त्यांनी बँकेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातील उद्दिष्टांमध्येही अशीच प्रगती साधण्यासाठी प्रोत्साहन दिले.

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह बँक्स (NAFSCOB) ही भारतातील सहकारी बँकांच्या क्षेत्रासाठी महत्त्वाची राष्ट्रीय संघटना आहे. या संस्थेची स्थापना सहकारी बँकिंग क्षेत्राला एकसंध व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांची प्रगती साधण्यासाठी करण्यात आली आहे. ही सहकारी बँकांच्या हितासाठी काम करणारी प्रमूख संस्था म्हणून ओळखली जाते.
ही संस्था सहकारी बँकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनास बळकटी देणेसाठी कार्यरत आहे.

बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे आणि सहकारी क्षेत्रात केलेल्या नावीन्यपूर्ण कार्यामुळे बँकेस हा बहुमान मिळाला आहे. बँकेच्या या यशामध्ये बँकेचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर ,खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, अध्यक्ष खा.नितीन काका पाटील, माजी मंत्री आ.बाळासाहेब पाटील , आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ .मकरंद आबा पाटील, मा.आ.प्रभाकर घार्गे ,बँकेचे उपाध्यक्ष मा.अनिल देसाई, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक मा. राजेंद्र शेठ राजपुरे व सर्व मा.संचालक मंडळ ,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच बँकेने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असल्याचेही यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक आदर्श संस्था असून, सातारा जिल्ह्याच्या कृषी ,उद्योगिक आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे. बँकेस प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल बँकेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments