प्रतिनीधी : मुंबई स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगार हा अतिशय महत्वाचा घटक असल्यामुळे मुंबईच्या नागरिकांचे आरोग्य सांभाळणे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करने हे सफाई कामगारांचे हाती असते.
त्यामुळे सफाई कामगार ज्या वसाहतीमध्ये राहतो आहे त्या दादर ,मुंबई स्थित कासारवाडी येते २५० घरांच्या असणार्या वसाहतीला मनपाचे आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगराणी यांनी सपत्नी यांनी सोमवारी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी सदिच्छा भेट देऊन कामगारांना सुखद धक्का दिला.
या भेटी मध्ये वसाहतीमधील सुख सोयी व्यस्थिस्त पुरेशा आहेत की नाही, कामगारांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते इत्यादी बाबत कोणालाही मध्यस्थी न घेता कामगारांशी प्रत्यक्षपणे दिलखुलासपणे परिस्थिती जाणून घेत गप्पा केल्या. या गप्पा करता करता घरातील बनवलेलाच फराळ घेईन या अटीवर दिवाळी फराळ आणि चहा सुद्धा भूषण गगरानी यांनी सपत्नी घेत अधिक रंजत गप्पा रंगवल्या होत्या. आयुक्त यांच्या धम्मपत्नी या महिलांसोबत एकरूप होऊन गप्पा करीत होत्या. वसाहतीमध्ये झाडू मारून साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचा झाडू आयुक्त श्री भूषण गगरांणी यांनी हातात घेऊन हा झाडू कोण आणि कसा बांधला जातो?तसेच हा झाडू किती दिवस टिकतो? इत्यादी बाबत चौकशी केली. कासारवाडी ही कर्मचाऱ्यांची वसाहत अतिशय सुंदर, स्वच्छ तसेच सर्वं सोयीसुविधानयुक्त आहे,असे* प्रतिपादन व समाधान भूषण गगरानी यांनी व्यक्त केल्यामुळे कर्मचारी वर्ग सुखावून गेला होता.
या सदिच्छा भेटी दरम्यान येथे कार्यरत असणारी व्यायाम शाळा,वाचनालय इत्यादींची पाहणी केली.
तदनंतर बौदजन पंचायत समिती संचालित बुद्ध विहाराला भेट देऊन तेथील असणारे छोटेसे ग्रंथालय पाहून समाधान व्यक्त केले.
कासारवाडीतील अनेक कुटुंबीयांनी आयुक्त गगराणी आणि त्यांच्या पत्नीचे ओव्हाळणी करून स्वागत केले.
काही घरात जाऊन स्वतः बसून एकंदरीत परिस्थितीची पाहणी,माहिती घेतली त्यामुळे कामगार वर्ग भारावून गेला होता. मुंबईच्या एकंदरीत स्वच्छतेत सफाई कामगारांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मोलाचे योगदान असल्यामुळे त्या सर्वांचे आभार मानून आयुक्त यानी दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आयुक्तांनी कासारवाडीला सदिच्छा भेट दिल्यामुळे कामगार वर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आयुक्त भूषण गगराणी यांचे आभार मानून त्यांना सुद्धा दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.