मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबादप्रमाणे यंदाही दि.१७ रोजी अनंतचतुर्दशी दिनी दुपारी २ वाजता भायखळा येथील खटाव मिल येथे गणरायांना निरोप देण्याचा समारंभ आयोजित करण्यात आलाआहे.भायखळा खटाव मिल कामगार आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वागत कक्षेत गणेश भक्तांसाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.एनटीसीच्या पोदार मिल कामगार प्रतिनिधी आणि कार्यकर्तेही या कामी सहकार्याचा हात देणार आहेत.तेथे मिरवणूकीने येणारा “लालबागचा राजा” हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला असून,तेथ रा.मि.म. संघ आणि कामगारांच्या वतीने लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येईल.संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर बजरंग चव्हाण,सुनिल अहिर, सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे,मारुती शिंत्रे आदी उपस्थित राहून गणरायाच्या निरोप समारंभात सहभागी होतील.संघटनेचे अध्यक्ष,शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे या प्रसंगी स्वागत करतील!••••
