Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोल्हापूरमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला चेंबूरच्या घाटला गावात सकारात्मक प्रतिसाद;...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला चेंबूरच्या घाटला गावात सकारात्मक प्रतिसाद; माजी खासदार राहुल शेवाळे यांनी साधला लाभार्थी कुटुंबांशी संवाद

मुंबई : महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट अभियाना’ची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियाना दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी दक्षिण- मध्य लोकसभा मतदारसंघातील घाटला,चेंबूर येथून या कुटुंब भेट अभियानाला सुरुवात केली. यावेळी शेवाळे यांनी लाभार्थी कुटुंबांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी या घरांमध्ये विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शनही शेवाळे यांनी घेतले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह लेक लाडकी योजना, वयोश्री योजना अशा विविध शासकीय योजनांची माहिती विस्तृतपणे देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन या कुटुंबांना केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments