प्रतिनिधी (रमेश औताडे) : राज्यसभा खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने जामिनावर सोडले कारण इडी कडे संजय सिंग यांच्या विरोधात काहीच पुरावे नव्हते. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतही असेच घडणार आहे. भाजपचा मनमानी कारभार आता उघडा पाडणार आहे. अशी माहिती आम आदमी पार्टीचे पदाधिकारी धनराज वंजारी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारताची लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजपाने केले आहे. भाजपाचे प्राण हे ईव्हीएम मशीन मध्ये आहे परंतु त्याचा आत्मा आता जनतेकडे असेल. त्यामुळे भाजपाचा ४०० पार चा नारा हा आता त्यांचे स्वप्नच राहणार आहे. न्यायालयाने आता इलेक्ट्रॉल बाँड ची तपासणी करणे गरजेचे आहे कारण एक्सटॉर्शन चे रॅकेट हे भाजपाच्या माध्यमातून ईडी चालवत आहे. खंडणीच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी भाजपाने विविध कंपन्यांना धमकावून जमा केला आहे असा आरोप धनराज वंजारी यांनी केला आहे.
भाजपाने आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून पक्षातील इतर आमदार व खासदारांना धमकावून भाजपाकडे खेचण्याचे षड्यंत्र केले होते. परंतु आम आदमी पक्षात सर्व देशभक्त व क्रांतिकारी लोक आहेत आम्ही सर्व भगतसिंगाचे चेले आहोत. देशहितासाठी जेल काय फाशी घेण्यास सुद्धा तयार आहोत. आणि त्यामुळेच भाजपाचा डाव फसला आहे .आज देशात जर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला घाबरत असतील तर फक्त आणि फक्त अरविंद केजरीवाल यांना घाबरतात हे आता स्पष्ट झाले आहे. असे धनराज वंजारी यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झाला आहे आणि सर्व भ्रष्टाचारीना सोबत घेऊन नरेंद्र मोदी आमच्या पार्टी विरुद्ध कारवाई करत आहेत हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. तसेच या लोकसभेच्या निवडणुकीत ४०० पार चा नारा हा आता त्यांचे स्वप्नच राहणार आहे असे ऍड.संदीप कटके यांनी यावेळी सांगितले.
संजय सिंग यांना सहा महिने जेलमध्ये फक्त यामुळेच ठेवण्यात आले की त्यांनी त्यांचा आवाज लोकांमध्ये भाजपाच्या विरुद्ध उचलला. भाजपा हा आमच्या पार्टीच्या नेत्यांना किती घाबरते हे आज सिद्ध झाले आहे. आम आदमी पार्टीचे बाकीचे नेतेही पुढच्या काळामध्ये निर्दोष बाहेर येतील यामध्ये कुठलीही शंका नाही. असे यावेळी ऍड संदीप कटके यांनी सांगितले.
.