आंगवली (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.आंगवली येथे श्री मार्लेश्वर देवालय (मठ )मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने रविवारी नामस्मरण (श्रावणी एक्का )ला सुरुवात झाली.आज सोमवार या नामस्मरणची सांगता दिवस आहे.यानिमित्ताने विविध क्षेत्रातील(राजकीय, सामाजिक, शिक्षण, वैद्यकीय, प्रसार माध्यम, पर्यावरण, अध्यात्मिक)अनेक मान्यवर व्यक्ती यांनी या मंदिरला भेटी देत नामस्मरणमध्ये सहभाग घेतला.आज वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. समूह अध्यक्ष प्रशांतजी यादव यांनी श्रावणी सोमवार एक्क्या निमित्त मंदिरात येऊन सह कुटुंब देवाचे दर्शन घेतले, तसेच भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून त्याच उद्योगसमूहामध्ये प्रक्रिया झालेले श्रीखंड डबे अर्पण केले.यावेळी श्री मार्लेश्वर देवस्थान रिलीजस अँन्ड चॅरिटेबल ट्रस्ट आंगवली मंदिर पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यानिमित्ताने महाप्रसादचेही आयोजन करण्यात आले. अनेक भक्तांनी याचा लाभ घेतला.
श्री मार्लेश्वर देवालय (मठ )आंगवली मंदिरात श्रावणी एक्क्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES