ठाणे – प्रादेशिक परिवहन ठाणे या कार्यालयामार्फत वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे विलंब शुल्क प्रतिदिन रुपये ५०/- आकारण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. विलंब शुल्क माफ करणे / विलंब शुल्काच्या आकारणीमधून सूट देण्याबाबत ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटनांकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली आहेत.
शासनाने वाहनधारक व विविध संघटना यांच्या निवेदनांचा व मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली व त्यास अनुसरुन प्रभारी मंत्री (परिवहन) महोदयांनी दि.११ जुलै २०२४ रोजी विधानसभा सभागृहात निवेदनाव्दारे १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५०/- एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.
त्यास अनुसरुन शासनाने दि.११ जुलै २०२४ रोजीच्या निर्देशाद्वारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५०/- इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे कार्यालयामध्ये सादर करावीत, असे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले आहे.
00000000000
वाहनधारकांनी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आपली वाहनेठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सादर करावी
RELATED ARTICLES