Monday, September 15, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई, ठाणे, नवी मुंबईस्वर्गीय लोकनेते तायाप्पा हरी सोनवणे यांच्या ११५ व्या जयंती निमित्त व्ही.एन.देसाई रुग्णालयात ...

स्वर्गीय लोकनेते तायाप्पा हरी सोनवणे यांच्या ११५ व्या जयंती निमित्त व्ही.एन.देसाई रुग्णालयात  रुग्णांना फळं वाटप!              


मुंबई:(दत्ता खंदारे) : संयुक्त सोलापूर जिल्ह्यांचे पहिले तत्कालीन खासदार स्वर्गीय लोकनेते तायाप्पा हरी सोनवणे यांच्या ११५ व्या जयंती निमित्त याही वर्षी म्हणजे दिनांक १०/०९/२०२५ रोजी तायाप्पा हरी सोनवणे सोशल फाउंडेशनच्या वतीने व्ही. एन.देसाई हॉस्पिटल सांताक्रूझ येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा श्री.गणेश विद्या म़ंदीर हायस्कूल धारावी चे सचिव श्री.राजेश खंदारे,सह सचिव श्री.नरसिंग कावळे, कामगार नेते शासन पुरस्कृत पुरस्कार्थी श्री सुर्यकांत इंगळे. श्रीक्षेत्र वेरुळ समाज सेवा मंडळाचे सचिव श्री अशोक पाटेकर,कक्कया समाज गणेशोत्सव पदाधिकारी श्री हेमंत ‌व्हटकर,विजय शिंदे.ककया समाज पदाधिकारी श्री राम कोकणे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प.)गटाचे तालुका अध्यक्ष श्री .गांगुर्डे जी. कुर्ला येथील उद्योजक श्री.नामदेव खरटमोल,शाहीर अण्णा भाऊ साठे यांची नात सुषमा साठे.प्रामुखाने उपस्थित होते. या प्रसंगी महात्मा सोसायटीचे क्रियाशील कार्यकर्ते श्री .सुभाष पोळ,विजय खंदारे. समाज सेवक श्री.रुपचंद नारायणकर, चंदा कटके, शशिकांत पोळ यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाची परवानगी व्हि.एन.देसाई रुग्णालयाचे माननीय डॉ .डीन यांनी दिली असल्याने उपस्थितीत सर्व स्टाफने रुग्णांना फळवाटपाच्या स्तुत्य कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य केले.तायपा हरी सोनवणे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.शिवाजी सोनवणे, सचिव, सौ. रुपाली सोनवणे,कार्यकारी मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments