ठाणे,प्रतिनिधी : लोकमान्य नगर परिसरातील कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरची अवस्था गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अत्यंत दयनीय बनली आहे. संबंधित एटीएममध्ये ना कुठलीच स्वच्छता केली जाते ना तिथले एअर कंडिशन (AC) चालू असते. अशा परिस्थितीत दिवसरात्र पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ग्राहकांनी अनेकदा तक्रारी करूनही बँकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. या ठिकाणी बँकेच्या कामकाजातील निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येतो. ग्राहक सेवा देणे ही बँकांची प्राथमिक जबाबदारी असते, मात्र येथे ती पूर्णतः झोपेत गेलेली दिसते.
केवळ एटीएमच नव्हे तर…..
कोपरखैरणे येथील कॅनरा बँक शाखांमध्येही कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. काही कर्मचारी सकाळी ११ नंतरच कार्यालयात पोहोचतात. त्यातच “लंच टाइम”, “सर्व्हर डाऊन” अशा कारणांमुळे ग्राहकांना वेळ वाया घालवावा लागतो.
या निष्काळजीपणाविरुद्ध बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. ग्राहकांना वेळेवर व सुसज्ज सेवा मिळणे ही आजच्या काळाची गरज आहे, ती झोपलेली यंत्रणा पुन्हा जागी करणे हीच जनतेची अपेक्षा आहे.