Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई, ठाणे, नवी मुंबईमंत्रालय सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्यांची श्रीलंकेत धडक ; सुप्रिया सुभाष लाडे यांनी पटकाविले...

मंत्रालय सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्यांची श्रीलंकेत धडक ; सुप्रिया सुभाष लाडे यांनी पटकाविले श्रीलंका मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत अभूतपुर्व यश

प्रतिनिधी : मंत्रालयात आधी महसूल व वन विभागात आणि नंतर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अशी सेवा बजावून फेब्रुवारी २०११ मध्ये निम्न श्रेणी लघुलेखिका पदावरुन शासकिय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सुप्रिया लाडे यांनी नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत ५००० मीटर चालण्याच्या वयवर्षे 70+ स्पर्धेत देशासाठी खेळतांना 55.29.8 वेळ नमूद करीत ब्राँझ पदक मिळविले. श्रीमती लाडे यांना शालेय जीवनापासूनच खेळाची आणि अभिनयाची आवड, थ्रोबाॅल, कबड्डी, खोखो आणि ॲथलेटिक्स १०० मी धावणे गोळा-फेक, लांब-उडी इत्यादी खेळात त्या वेळोवेळी सहभागी झाल्या. शाळा, महाविद्यालयीन शिक्षणानंतर नागपूरहून मंत्रालयात आल्या. सचिवालय जिमखाना स्पर्धेत सांघिक तसेच अनेक वैयक्तिक बक्षीसे त्यांनी मिळविली आहेत. महाविद्यालयीन जीवनात कामगार कल्याण केंद्रांतर्गत झालेल्या खेळाच्या स्पर्धेमध्येही अनेक बक्षिसे तसेच कामगार कल्याण केंद्राच्या नाट्यस्पर्धेतही नाटकाला आणि अभिनयासाठी प्रथम पारितोषिक मिळाले होते. डोंबिवली येथे त्या सातत्याने नियमित सराव व नियोजन करतात. महिला कर्मचारी वयाच्या 70 वर्षा नंतर स्पर्धेत यश मिळवते हे इतर कर्मचारी व समाजासाठी कौतुकास्पद आहे.
या स्पर्धेतील यशाच्या श्रेयाबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की, मुलांनी तसेच सर्व हितचिंतकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. सुप्रिया सुभाष लाडे यांनी कांस्य पदक पटकावल्यानंतर अभिमानाने श्रीलंका येथील स्टेडियमवर तिरंगा फडकविला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments