प्रतिनिधी : “कोंबडी आधी की अंडं?” हा प्रश्न अनेक वर्षांपासून माणसाच्या कुतूहलाचा विषय ठरत आला आहे. अनेकदा हा प्रश्न मजा म्हणून विचारला जातो, पण त्यामागे खोल वैज्ञानिक आधार आहे. आता या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञांनी शोधून काढलं असून, त्यामागचं शास्त्र उलगडलं आहे.
‘नेचर इकोलॉजी अँड इव्हॅल्यूएशन’ या नामवंत जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, वैज्ञानिकांनी 51 प्राचीन जीवांचे जीवाश्म आणि 29 आज जिवंत असणाऱ्या प्रजातींचा अभ्यास केला. या अभ्यासात जीवांना दोन गटांत विभागण्यात आलं – अंडी देणारे ओव्हिपरेस आणि जिवंत पिल्लांना जन्म देणारे व्हिव्हिपेरस.
संशोधनात असं आढळलं की, कोंबडीचे पूर्वज हे जिवंत पिल्लांना जन्म देणारे म्हणजेच व्हिव्हिपेरस जीव होते. ते अंडी घालत नव्हते. अंडी देण्याची ही प्रक्रिया नंतरच्या उत्क्रांतीत विकसित झाली.
तसंच, कोंबडीच्या अंड्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारं OC-17 नावाचं प्रोटीन केवळ कोंबडीच्या अंडाशयात तयार होतं. त्यामुळे वैज्ञानिक असं सांगतात की, कोंबडी आधी आली आणि नंतर तिच्या अंड्यांची निर्मिती सुरू झाली.