करक : .राजापूर तालुक्यातील करक येथे बौद्ध विकास मंडळ करक ,मुम्बई आणि ग्रामीण ,राहुलवाडी ,तालुका राजापूर तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सौदल येथील लॅबक क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले .
दोन दिवस (१४ आणि १५ मे २०२५) चाललेल्या या स्पर्धेत जांगलदेव संघ -करक याने द्वितीय तर दोस्ती यारी इलेव्हन या संघाने त्रितिय क्रमांक पटकाविला,.एकूण १४ संघ या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेचे उदघाटन ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष जनार्दन जाधव यांच्या हस्ते झाले .स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ..
व्यासपीठावर अध्यक्ष जनार्दन जाधव ,माजी राजापूर तालुका बॊध्दजन संघ गट क्रं ३ चे अध्यक्ष डॉक्टर विश्वास जाधव ,सरपंच सुरेश ऐनारकर ,माजी सरपंच विलास नारकर,पोलीस पाटील महेंद्र जाधव ,सचिव अनंत जाधव , सौ भामिनी सुतार ,माजी सचिव आशिष जाधव ,बबन जाधव,निलेश जाधव .ललिता जाधव उपस्थित होते,विजेत्या संघाना रोख रक्कम आणि चषक अनुक्रमे १०००० रुपये ,७०००रुपये आणि ५००० रुपये देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेला बौद्ध विकास मंडळ करक ,मुम्बई आणि ग्रामीण ,आजी -माजी सदस्य ,पदाधिकारी ,कार्यकर्ते या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले .तसेच करक गावातील तसचे पाचल पंचक्रोशी मधून मोलाचे सहकार्य आणि प्रतिसाद मिळाला