सातारा(अजित जगताप ) : एकेकाळी सातारा जिल्ह्यातील राजकीय बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना भरभरून दिले. तसेच सत्ताही उपभोगली. मात्र राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. तरीही महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन जिल्हा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर व आमदार सचिन पाटील उपस्थित होते. त्यांच्यासमोरच पक्षाच्या गमजा दुर्लक्षित झाल्याचे अनेकांनी अनुभवले.
याबाबत माहिती अशी की सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे व महिला आयोगाचे अध्यक्ष चाकणकर मॅडम येणार असल्याने पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गमजा गळ्याभोवती गुंडाळला होता. त्यानंतर मेळावा व नेत्याची पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक जणांनी कोपऱ्यात गमजा टाकला तर काहींनी खिडकीवर अडकवला. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भवन च्या दारातच एक गमजा पडल्याचे पाहून सातारा तालुका अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पुढाकार घेऊन हा गमजा सन्मानाने कार्यालयात ठेवला. पण इतर कार्यकर्त्यांनी त्याकडे पाहण्याची तसदी घेतली नाही. शेवटी पक्षाच्या झेंडा व गमजा महत्त्वाचे चिन्ह मानले जाते. त्याची जर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते काळजी घेत नसतील तर अशा लोकांची पक्ष्यावर किती दुष्ट असेल? हे न सांगितलेले बरे अशी प्रतिक्रिया उमटू लागलेली आहे. दरम्यान ,राष्ट्रवादी भवन मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका पदाधिकाऱ्याला पुढे जाण्यासाठी वाट न मिळाल्यामुळे त्याने पत्रकारावरच तमाशा करू नका. असा सल्ला देऊन आपल्या राग व्यक्त केल्याची प्रदेशाध्यक्षांनी नोंद घेतल्याचे सांगण्यात येत आहे. जे पूर्वीच्या पक्षाचे झाले नाहीत ते नवीन पक्षाचे काय होणार असे जाणकारांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
________________________&&&&&&&
फोटो— सातारा नवीन राष्ट्रवादी भवनच्या आवारात पडलेले राष्ट्रवादी पक्षाचे गमजा (छाया– अजित जगताप सातारा)
———————————————-
साताऱ्यात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षाच्या समोरच पक्षाच्या गमजा दुर्लक्षित
RELATED ARTICLES