सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने आज सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी कर्तव्यदक्ष अधिकारी तुषार जोशी यांची नियुक्ती केली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
भारतीय पोलीस सेवेतील तुषार दोशी यांनी फिजिक्समध्ये पदवी घेतली. पदवीनंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तुषार दोशी यांचे वडील हे रायगड जिल्हा परिषदेत नोकरी करायचे. २००१ मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टींग चंद्रपूरमध्ये करण्यात आली.३ सप्टें, २०
रोजी मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी लाठीमाराच्या घटनेनंतर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी बदली झाली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती पुणे लोहमार्ग येथे करण्यात आली.
जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर दोषी यांना निलंबित करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा ने सातत्याने केली होती. त्यानंतर तुषार दोशी यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर शासनाने त्यांची नियुक्ती सी.आय.डी.मध्ये केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात आयपीएस तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आल्याने सातारचे पोलीस आयुक्त समीर शेख यांची मुंबई शहरातील उपयुक्त पदी वर्णी लागलेली आहे.
साताऱ्यातील वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारांच्या आश्रयदात्यांना वटणीवर आणण्यासाठी कायद्याचे तुषार नक्कीच बरसतील. पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांचे गुन्हेगारांशी असलेल्या संबंध याबाबत त्यांनी लक्ष वेधून घ्यावे. असा आशावाद सर्वसामान्य सातारकर यांना वाटू लागले आहे. नवीन पोलीस अधीक्षक यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्या भेटीसाठी आता समाजातील विविध स्तरातील लोकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात रीग लागले क्रमप्राप्त आहे.
______________________________
फोटो– सातारा जिल्हा नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी