Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रलांजा तालुक्यातील गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनतर्फे कोकण कन्या सृष्टी कुळये यांचा सत्कार

लांजा तालुक्यातील गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनतर्फे कोकण कन्या सृष्टी कुळये यांचा सत्कार

मुंबई (शांताराम गुडेकर) : सृष्टी कुळये ही मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील शिरवली (पलीकडचीवाडी )येथील राहणारी,सध्या ती मुंबईत राहते.तिचे वडील सुरेश कुळये हे मुंबईत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात,तर आई गृहिणी आहे. सृष्टी हिला दोन भावंडे असून,ती या सर्वात मोठी आहे.घरची परिस्थिती बेताची आहे, तरीही सृष्टी हिने केवळ जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर सृष्टी हिने यूपीएससीमध्ये यश संपादन करत देशात ८३१ रँक मिळवली.
लेकीने (सृष्टी )मिळविलेल्या यशानंतर आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कु.सृष्टी कुळये हिचे तिच्या मानखुर्द येथे राहत्या घरी जाऊन लांजा तालुक्यातील शिक्षण,समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक डॉ.श्री. चंद्रकांत शिवराम करंबळे,वकील श्री.मनोहर मांडवकर,गुरुमाऊली फाउंडेशनच्या सदस्य सौ.दिपाली करंबळे, कुमारी निशा मांडवकर व सृष्टीचे आई वडील यांच्याकडून पुष्पगुछ,शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच तिच्याशी आणि तिच्या परिवाराशी सुसंवाद साधण्यात आला.तिच्या UPSC स्पर्धा परीक्षेबद्दलचा प्रवास, तिने केलेली मेहनत इ.गोष्टीची माहिती घेऊन उपस्थित सभासदांनी तिला मंडळातर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.
हा कार्यक्रम श्री.चंद्रकांत करंबळे यांच्या माध्यमातून पार पडला.त्यामुळे उपस्थित सभासद यांचे यानिमित्ताने आभार व्यक्त करण्यात आले.सृष्टीला यश, कीर्ती आणि दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थनाही या सत्कार दरम्यान करण्यात आली.समाजाची मुलगी म्हणून समाजसेवक चंद्रकांत करंबळे यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते.
सध्या सृष्टी मुंबईतील मानखुर्द शिवनेरीनगर येथील झोपडपट्टीत राहत असल्याने या ठिकाणी तिचा अभ्यास होत नव्हता. त्यामुळे तिने सन २०२२ मध्ये गोवंडी येथील एम.पॉवर लायब्ररीत प्रवेश घेतला. घरात कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक वातावरण नाही.घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे कोणतीही शिकवणी नाही. अशा परिस्थितीतही सृष्टी हिने केवळ इच्छाशक्ती आणि अभ्यासाच्या जोरावर गरुडझेप घेतली. तिने मिळविलेल्या या यशानंतर त्याच्या परिवारातर्फेआणि अनेक ग्राम मंडळ, मुंबई मंडळ यांच्यातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.
घरच्या परिस्थितीची कल्पना होती.आई-वडिलांचे कष्ट पाहत होते. त्यामुळे चांगले शिकायचे आणि मोठे व्हायचे हे मनाशी ठरविले होते.त्यासाठी आई- वडील, माझे मार्गदर्शक शिक्षक, मला प्रोत्साहन देणारे हितचिंतक यांचे पाठबळ मिळाले. या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे मी हे यश मिळवू शकले असे सृष्टी कुळये यांनी सत्कारला उत्तर देताना स्पष्ट केले. या यशा बद्दल लांजा तालुका मधील अनेक मंडळ, समाज शाखा यांच्या तर्फे सृष्टी यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments