कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले असून, आज तहसील कार्यालय कराड येथे शासकीय परिपत्रकानुसार प्राथमिक टप्प्यात मोफत वाळू वाटपासाठी पासचे वितरण करण्यात आले.हा उपक्रम माननीय प्रांत अधिकारी उत्तम दिघे साहेब, तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम, तसेच पंचायत समिती कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील साहेब यांच्या सहकार्यातून राबवण्यात आला.या उपक्रमांतर्गत प्राथमिक यादीतील लाभार्थ्यांना पासचे वितरण पूर्ण झाले असून, उर्वरित घरकुल धारकांसाठीही लवकरच वाळू वाटपासाठी पास उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही माहिती संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आली आहे.हा उपक्रम शासनाच्या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या वाळूच्या उपलब्धतेबाबत दिलासा देणारा असून, प्रशासनाच्या तत्परतेचे प्रतीक आहे.
घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपासाठी पासचे वितरण सुरू — कराड तहसील कार्यालयात महत्वपूर्ण पाऊल
RELATED ARTICLES