प्रतिनिधी : जावळी महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील खरोशी, वेळापूर व वाळणे केंद्र शाळेतील जवळपास २५० विद्यार्थी वर्गासाठी कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्था व एक हात मदतीचा (मुंबई ) या दोन्ही सामाजिक संघटनेचा वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम दिनांक 09 व 17 मे 2025 रोजी संपन्न झाला.
या सोहळ्याला सर्व ग्रामस्थ मंडळी व सर्व मान्यवर मंडळी यांची उपस्थिती लाभली. संस्थेचे मार्गदर्शक सन्मानीय श्री संपत कोंडीराम नलावडे (वाळणे), MMRDA चे अधिकारी श्री शैलेश जाधव ( देवसरे), श्री विलास शेलार रेणोशी, श्री अर्जुन दादा चव्हाण लामज, श्री आनंद गुरुजी वेळापूर, श्री प्रकाश गुरुजी वेळापूर, श्री ढेबे सर खरोशी, वेळापूर केंद्रप्रमुख जंगम सर, वाळणे केंद्रप्रमुख श्री धनावडे सर, श्री अमोल सकपाळ गुरुजी वाळणे, समस्त शिक्षक व सह कर्मचारी, विद्यार्थी वर्ग, समस्त सरपंच व पोलिस पाटील आदी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती. गेली १४ वर्ष संस्था समाज बांधवांसाठी सामुदायिक विवाह सोहळा, वधू वर परिचय मेळावा, सह्याद्री जल्लोष, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबिर असे समाज हिताचे उपक्रम साकारते याचा नक्कीच फायदा हा तळा गाळातील समाज बांधवांसाठी होत असतो अशी सद्भावना मान्यवर मंडळी यांनी कार्यक्रमात उपस्थित केली.
संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व मान्यवर मंडळीचे पाठबळ यामुळे उपक्रम यशस्वी झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री दिपक कृष्णा शिंदे ( पाली), संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण जाधव (कुरोशी), उपाध्यक्ष श्री सीताराम जाधव ( तेटली), संस्थेचे सचिव श्री संदीप नलावडे ( वाळणे), उपसचिव श्री सतीश शिंदे ( कुरोशी), खजिनदार श्री. अण्णाबुवा शिंदे (सावरी), श्री विशाल शिंदे (पाली), संस्थेचे सल्लागार श्री सूर्यकांत शिंदे (सावरी), श्री धोंडीराम शेलार (रेणोशी), श्री सुरेश मालुसरे ( फूरूस) ,संस्थेचे संपर्क प्रमुख, श्री सचिन शेलार ( कोट्रोशी), प्रसिद्धी प्रमुख श्री सुशांत कदम (येरणे), श्री लहू मोरे (आमशी), महिला संपर्क प्रमुख सौ. जयश्री ताई जाधव ( तेटली ) व सौ नंदाताई शिंदे (पाली) , सौ. अर्चना गोळे आदी सर्व कार्यकर्त्याचा उपस्थितीत सोहळा पार पडला.
एक हात मदतीचा या सेवाभावी संघटनेचा वतीने श्री कैलास पांगम, श्री. सचिन शेलार, श्री विश्राम धरणे, श्री विनायक कांबळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.