Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्रभाजपाच्या 81 जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल  भाजपा जिल्हाध्यक्षांच्या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये-...

भाजपाच्या 81 जिल्हाध्यक्षांची बनावट यादी व्हायरल  भाजपा जिल्हाध्यक्षांच्या बनावट यादीवर विश्वास ठेवू नये- रवींद्र चव्हाण

प्रतिनिधी : सोशल मीडियावर “भाजपा जिल्हाध्यक्ष 2025” या नावाने फिरणारी 81 जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. आतापर्यंत भाजपाच्या फक्त 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन श्री.चव्हाण यांनी केले आहे.

सदरील बनावट यादीत अनेक चुकीची नावे असून, ती हेतुपुरस्सरपणे पसरवण्यात येत असल्याची शक्यता पक्षानं व्यक्त केली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असून, ती लवकरच पूर्ण होईल, असंही श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून, खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी फक्त अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments