Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्र१०० दिवसांच्या उपक्रमात अमळनेर प्रांत कार्यालय नाशिक विभागात प्रथम

१०० दिवसांच्या उपक्रमात अमळनेर प्रांत कार्यालय नाशिक विभागात प्रथम

मुंबई (शांताराम गुडेकर) : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

भौतिक सुविधांसह जनतेला तत्पर सेवा, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा,
कर्मचाऱ्यांची वागणूक असे काही निकष देण्यात आलेले होते. यात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी पिण्याचे शुद्ध पाणी, रेकॉर्ड रूम अद्ययावत करून त्याचे संगणकीकरण करणे, जेष्ठ नागरिकांची प्रकरणाचा तात्काळ निपटारा केल्याने आणि जनहिताच्या निर्णय घेतल्याने अमळनेर उपविभाग नाशिक विभागात प्रथम आला आहे.

उपविभागीय कार्यालय नाशिक विभागात प्रथम आल्याने प्रांत नितीनकुमार मुंडावरे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments