मुंबई (शांताराम गुडेकर) : स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी विषय असणारी पत्रकार परिषद शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघ (नोंदणीकृत) पहिला मजला पत्रकार भवन, आझाद मैदान, बाळशास्त्री जांभेकर चौक, महापालिका मार्ग, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.या पहिल्याच ऐतिहासिक पत्रकार परिषदेकडे अनेक राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.तसेच अनेक जणांची उत्सुकता वाढली आहे.कोकणातील जनतेच्या आशा- आकांशा, स्वप्ने, निराशा या सगळ्यांचा सामूहिक उध्दार म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान असुन कोकणची वैचारिक परंपरा,सहिष्णुतेची उदरतेची असली तरी कोकणचे सर्वच क्षेत्रात अधः पतन झाले आहे.जोपर्यंत कोकण प्रांत महाराष्ट्रात अंतर्भूत आहे तोपर्यंत कोकणचा विकास होणार नाही.तसेच अविकसित काळ हा काळ गुलामगिरीचा काळ म्हणून भविष्यात ओळखला जाईल. त्यासाठी स्वतंत्र कोकणराज्याचा एल्गार पुकारला आहे.यासाठी कोकणातील अनेक सामाजिक संघटना, विविध समवैचारिक प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन व अनेक उद्योजकांनी या अभियानाचे स्वागत करून पाठिंबा दिला आहे. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
स्वतंत्र कोकण राज्याची ३१ मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद
RELATED ARTICLES