तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील चाळकेवाडी (कुंभारगांव) येथे सौ.सविता आणि आप्पासोा निवडूंगे यांची कन्या अक्षता आणि सुनील सावंत यांचे चिरंजीव अक्षय यांचा साखरपुडा शनिवार दि.17 मे, 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या नवदांम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. शुभेच्छा देताना अनेकांनी अक्षता आणि अक्षय यांना भेटवस्तू म्हणून फ्रेम, बुके दिले.
मात्र यामध्ये रयत विद्यार्थी विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी आणलेल्या संविधान उदे्दशिकेच्या फ्रेमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, पाटण तालुका बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, माजी उपसभापती रमेश मोरे, माजी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, नानासाहेब सावंत, शिवाजी सुर्वे, प्रा.ए.बी.कणसे, चंद्रकांत चाळके, अशोक माटेकर, डाॅ.दिलीपराव चव्हाण, चंद्रकांत काजारी, प्रवीण निवडूंगे, मारुती निवडूंगे, संदीप डाकवे, प्रा.सचिन पुजारी, किशोर मोरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान प्रत्येक घरात पोहचले पाहिजे. जीवन जगण्याचा अधिकार दिला ते संविधान देशातील प्रत्येक नागरिकाच्या घराघरात असावे, त्यातून आपल्याला आपले हक्क आणि जीवन जगण्याचे मार्ग सापडतात. तरुण पिढीला आपले हक्क यांची जाणीव हवी त्यासाठी अक्षय चव्हाण यांनी संविधानाच्या उद्देशिकेची फ्रेम नवदांम्पत्याला भेट म्हणून दिली.
साखरपुडा कार्यक्रमात लोकशाही मूल्य आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असलेल्या संविधान उद्देशिकेची फ्रेम भेट देऊन एक नवा पायंडा पाडला आहे. वाढदिवस, लग्न, साखरपुडा अशा कार्यक्रमात संविधान उद्देशिकेची अनोखी फ्रेम भेट देत अक्षय चव्हाण यांनी लोकशाही मूल्ये रुजविण्याचा जो प्रयत्न केला आहे तो निश्चित कौतुकास्पद आहे.
पेशाने असिस्टंट ऑफ सिव्हील इंजिनिअरींग असलेले अक्षय चव्हाण हे सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या उपक्रमांना समाजातून उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळतो.
संविधान उद्देशिका भेट देऊन नव दांम्पत्याला शुभेच्छा
RELATED ARTICLES