Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रचेंबूरमध्ये घुमला 'भारत माता की जय 'चा नारा.... तिरंगा रॅलीला नागरिकांचा उदंड...

चेंबूरमध्ये घुमला ‘भारत माता की जय ‘चा नारा…. तिरंगा रॅलीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद _ माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

मुंबई : पहलगाम येथील पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ च्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याला सलाम करत जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी चेंबूर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ तिरंगा रॅली ‘ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रविवारी सकाळी 10 वाजता पांजरपोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू झालेल्या या रॅलीचे नेतृत्व माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केले. दुचाकी आणि चारचाकी वाहनांमधून शिवसैनिक आणि स्थानिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले. यावेळी आमदार तुकाराम काते, विभागप्रमुख श्री अविनाश राणे, महिला विभागप्रमुख सौ. सुनीता वैती
माजी नगरसेविका सौ. पुष्पाताई कोळी, माजी नगरसेविका सौ. अंजलीताई नाईक, लक्षण कोठारी, दीपक महेश्वरी, कैलास आरवडे, देवेंद्रसिंग राजपूत, अन्य मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून पाकिस्तानातला धडा शिकविणाऱ्या भारतीय सैन्यदलाचे आभार मानण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीने शिवसेना पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना विभागक्रमांक 11 च्या वतीने अणुशक्तीनगर व चेंबूर परिसरात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पांजरपोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात झाली. तिरंगा ध्वज घेऊन बाईकवर स्वार झालेले माजी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार तुकाराम काते यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. पांजरपोळ येथून देवनार डेपो, लॅक्मे कंपनी रोड, पटवर्धन हायस्कूल,बोरबादेवी चौक, आचार्य कॉलेज, सुभाष नगर, चेंबूर रेल्वे स्थानक मार्ग येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ही रॅली दाखल झाली. याठिकाणी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून शेवटी राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली.पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरमधून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याच्या पाठीशी देशभरातील सर्व नागरिकांची शक्ती उभी आहे, हे अधोरेखित करून जवानांचे मनोबल वाढण्यासाठी या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून भारतीय जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या कणखर नेतृत्वात भविष्यातही भारत दहशतवादाच्या विरोधात आक्रमकपणे लढेल, असा विश्वास सर्व भारतीयांना आहे.
– राहुल रमेश शेवाळे, माजी खासदार

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments