प
्रतिनिधी | स्वानंद सुखनिवासी
सद्गुरु संत सिद्राम बाबा आणि केदार बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत, मौजे घोगाव (ता. कराड) येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह शनिवार, 17 मे 2025 पासून शनिवार, 24 मे 2025 पर्यंत संपन्न होणार आहे. या मंगल सोहळ्याची आज उत्साहात सुरुवात झाली.कार्यक्रमाची सुरुवात विना भुजग मृदंग पूजन, दीपप्रज्वलन, माऊली पूजन, झेंडा पूजन आणि गणेश पूजनाने झाली. या वेळी ह.भ.प. शंकर हरी पाटील, ह. भ.प. रोहित महाराज शेवाळे, जयवंत सुतार, शहाजी पाटील, श्री बाळसिद्ध भजनी मंडळ, ह.भ.प. आनंदा शेवाळे, ज्ञानेश्वर माऊली, सुरेशभाऊ भावके., प्रवीण सावंत, तसेच बाळकृष्ण सखाराम साळुंखे सर, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.व्यासपीठ चालक ह.भ.प. महादेव अण्णा येळापूरकर आणि चोपदार ह.भ.प. मोहन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात सुरू झाला आहे.या सप्ताहात नावाजलेले प्रवचनकार व कीर्तनकार समाजप्रबोधनाचे कार्य करणार असून, भाविकांना अध्यात्मिक लाभ मिळणार आहे.भक्तजनांनी या सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.