मुंबई : ग्लोकल कम्युनिकेशन्स प्रा. लि. या नामांकित जनसंपर्क व डिजिटल मार्केटिंग एजन्सीला टाइम्स नेटवर्कव्दारे ‘जेम्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डिजिटल मार्केटिंग आणि पब्लिक रिलेशन्स सोल्यूशन्स या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते हा पुरस्कार कंपनीचे संचालक भास्कर तरे व पराग धुर्के यांना प्रदान करण्यात आला.
गेल्या दशकभरापासून, ग्लोकल कम्युनिकेशन्स ही पीआर आणि कम्युनिकेशनच्या क्षेत्रातील एक विश्वासार्ह संस्था म्हणून नावारूपास आली आहे. हेल्थकेअर, फार्मा, शिक्षण, पर्यटन, स्टार्टअप्स, रिटेल, ऑटोमोबाइल्स, सोलर एनर्जी यांसारख्या विविध क्षेत्रातील नामांकित ब्रँड्ससोबत कार्य करीत, ग्लोकलने नवोन्मेषी संकल्पना, प्रभावी मोहिमा आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांद्वारे आपली खास ओळख निर्माण केली आहे. कंपनीचे कार्यालय मुंबईसह आपल्या विस्तारीत नेटवर्कव्दारे महाराष्ट्रासह देशभर सेवा पुरवत आहेत.
डिजिटल माध्यमातील बदलत्या प्रवाहांची जाणीव ठेवत, ग्लोकलचा डिजिटल उपविभाग – जी सी डिजिटल – व्हिज्युअल स्टोरीटेलिंग आणि इंटिग्रेटेड डिजिटल सोल्यूशन्सच्या माध्यमातून आघाडीवर आहे.
ग्लोकल कम्युनिकेशन्स व जीसी डिजिटल चे संचालक भास्कर तरे म्हणाले, “या सन्मानामुळे आमच्या संपूर्ण टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि क्रिएटिव्ह दृष्टिकोनाला बळ मिळाले आहे. आमचे ग्राहक, त्यांचा विश्वास आणि आमचा ‘क्लायंट फर्स्ट’ दृष्टीकोन – हेच आमच्या यशाचे खरे कारण आहे. हा सन्मान आमच्या सर्व स्टेकहोल्डर्सना समर्पित आहे.”
ग्लोकल कम्युनिकेशन्स व जीसी डिजिटल चे संचालक पराग धुर्के म्हणाले की “हा पुरस्कार मान्यता म्हणजे आमच्या इनोव्हेटिव्ह आणि प्रभावी कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीजचा सन्मान आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आणि आम्ही पीआर व डिजिटल मार्केटिंगमध्ये नवे मापदंड निर्माण करत राहू.”