Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रवस्तुनिष्ठ मुद्द्याने सह्याद्री बँक सभासदांची आकाश कंदीलने मने उजळली...

वस्तुनिष्ठ मुद्द्याने सह्याद्री बँक सभासदांची आकाश कंदीलने मने उजळली…

मुंबई(अजित जगताप) : पश्चिम महाराष्ट्रातील माथाडी व कापड बाजार कामगारांच्या न्याय हक्कासाठी व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मुंबईत दि सह्याद्री सहकारी बँकेची स्थापना झाली. आज सह्याद्री बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार पॅनलच्या मान्यवर मंडळींनी प्रचारामध्ये वस्तूनिष्ठ मुद्दे सभासद मतदारांपर्यंत पोहोचवली आहेत. यामुळे सभासदांच्या मनात आकाशकंदीलाने मन उजळले आहे.
सहकार पॅनलचे प्रमुख व संघटित नेतृत्व पुरुषोत्तम माने यांच्या पारदर्शक कारभाराने सह्याद्री सहकारी बँकेचे संकटाचे काळे ढग नाहीसे झालेले आहेत.
सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे सह्याद्री बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधकांकडे भरीव व मनाला पटतील असे कोणतेही मुद्दे दिसून येत नाही.
लांडगा आला रे लांडगा आला… अशी आरोळी ठोकून फार काही हाताला लागत नाही. त्यामुळे सह्याद्री बँक बुडाली. बँक बुडाली असा एकच सूर आता सभासदांनाही कंटाळवाणी वाटू लागलेले आहे. या उलट सहकार पॅनलने सहकार महर्षी व भाग्यविधाते स्वर्गीय नामदेवराव कदम बापू कामगार नेते बाबुराव जाधव व मान्यवरांच्या विचाराची ज्योत आकाश कंदील माध्यमातून सहकार पॅनलने तेवत ठेवली आहे. कामगारांचे स्फूर्ती स्थान व प्रगतशील नेतृत्व पुरुषोत्तम माने आणि त्यांना समर्थ साथ देणारे तज्ञ संचालक अँड संजीव कदम यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने यशस्वी मार्गक्रमण केले आहे. आणि पुढेही करत राहणार आहे.
सह्याद्री सहकारी बँकेच्या प्रचारानिमित्त कापड बाजार कामगार व माथाडी कामगार, हातगाडीवाले सभासद यांची एकजूट पाहण्यास मिळाली आहे. मुंबई शहरातील कापड बाजार-५४४८ चिराबाजार-३२१४ लालबाग- १०५४ कामोठे- ४४३,डोंबिवली- २३३,भिवंडी-५६८, सह्याद्री नगर चारकोप कांदिवली- २३४५ सभासदांशी संपर्क ठेवून सहकार पॅनलने विरोधकांचा व्हाईट वॉश केला आहे.
परिसरात बैठका व चर्चा आणि परिसंवाद आयोजित करून सहकार पॅनलने सभासदांच्या हिताची भूमिका घेतली आहे. हे सभासदांना आता बँकेच्या प्रगतीची आकडेवारी पाहून खात्री पटली आहे.
दि सह्याद्री सहकारी बँकेचे १६,७२४ सभासद रविवार १८ मे २०२५ रोजी मतदानासाठी सज्ज झालेले आहेत. कोरेगाव तालुक्यातील अंबवडे, जाधववाडी, शिवथर ,मालगाव, आरळे, फडतरवाडी, भक्तवडी, रेवडी, आसनगाव, सोनके, जगताप नगर, नांदवळ, सोळशी, पळशी, देऊर, अरबवाडी येथील सुज्ञ सभासदांची नेहमीप्रमाणे संपर्क ठेवला आहे. या प्रचारानिमित्त पुरुषोत्तम माने, किरण देसाई, अरविंद कदम, किरण निकम, इस्माईल सय्यद, दत्तात्रय शिंदे, हनुमंत कदम, सुजाता चव्हाण, उज्वला चव्हाण, बाबुराव कुंभार, राम नामदास, संजय गिरी गोसावी, अंकुश जाधव असे दमदार उमेदवार सहकार पॅनलचे पिलर बनले आहेत. त्यामुळे ही इमारत भक्कम आहे. याची विरोधकांनाही जाणीव झाल्याचे चित्र दिसत आहे. संचालक मंडळामध्ये संधी मिळाली नाही तरीही पॅनल प्रमुख पुरुषोत्तम माने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विद्यमान संचालक दिलीप कदम व सौ भिलारे या सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेत असल्याने बँकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक असल्याचे अनेक जण सांगत आहेत. आता किमान दीड ते दोन हजार मताधिक्याने सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील. अशी सभासदांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments