मुंबई(रमेश औताडे) : आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो अशी भावना ठेवली तर समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य शिक्षण कौशल्य विकास ग्रामविकास आदी सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी देशातील आघाडीच्या ७५ आय टी कंपन्यांनी एका वर्षात पाच हजार ४४३ कोटी रुपये सामाजिक दान दिले आहे.
सरकाने कायदा केला असल्याने देशातील आघाडीच्या टेक कंपन्यानी सामाजिक कल्याण म्हणून दोन टक्के हिस्सा गोरगरीब समाजाला सामाजिक दान म्हणून म्हणून दिला आहे. न्यास काम संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला त्यात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.मागील आकडेवारी सांगत असताना अहवालात अशी माहिती दिली आहे की, २०२२ साली १९ हजार पेक्षा जास्त कंपन्या या सामाजिक कल्याण योजनेत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर २०२३ साली २२ टक्के कंपन्या वाढल्या आहेत.
सरकार अनेक योजना मार्फत सामाजिक विकास करत असते. तरीही विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे सामाजिक कल्याण म्हणून खाजगी कंपन्या मार्फत सरकार विकास करत असते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय च्या जमान्यात आता टेक कंपन्या वाढत आहेत. रस्त्यांचा फंड वाढत आहे. असे या अहवालात स्पष्ट केले आहे.