Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्र“ऑपरेशन अभ्यास ” मॉक ड्रिल उद्या नवी मुंबईतील “वाशी सेक्टर 12” मध्ये

“ऑपरेशन अभ्यास ” मॉक ड्रिल उद्या नवी मुंबईतील “वाशी सेक्टर 12” मध्ये

ठाणे : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन ठाणे जिल्ह्यातील नीलसिद्धी टॉवर, ए आणि बी विंग, एनएमएमटी टर्मिनस जवळ, प्लॉट नं. 95, सेक्टर 12, वाशी, नवी मुंबई येथे मंगळवार दि.13 मे 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आले आहे.
हे मॉक ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने,अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रांताधिकारी उर्मिला पाटील व शहर अभियंता तथा मुख्य अग्निशमन अधिकारी शिरीष आरदवाड,नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार उमेश पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणार आहे.
मॉक ड्रिल मध्ये होणारा घटनाक्रम:-
• सायरन वाजणार.
• Air Strike/ बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळणार.
• सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना दिल्या जाणार.
• धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले जाईल.
• संबंधित परिसरात शोध मोहीम घेवून जखमी, अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, ही कार्यवाही करण्यात येईल.
यानुषंगाने सर्व यंत्रणांनी या मॉक ड्रिलला गांभीर्याने घ्यावे. केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यशस्वीरित्या ही मॉक ड्रिल पार पाडावी. मॉक ड्रिलच्या दरम्यान सूचना मिळाल्यानंतर दुपारी 4.00 वाजता सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल.या दरम्यान नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, सेल्फी काढू नये आणि प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, हे मॉक ड्रिल केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन तहसिलदार उमेश पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments