प्रतिनिधी : विभागातील तसेच परिसरातील सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय अरविंद कटके यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या समाजकार्याची आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची आठवण करताना उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.या श्रद्धांजली सभेस शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विठ्ठल पवार, काँग्रेसचे दीपक खंदारे, शिंदे गटाचे राजेश खंदारे, माजी नगरसेवक वसंत नकाशे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर, श्री. उत्तम शिंदे, युवा संस्थेचे अनिल इंगळे, चाळ मालक नितीन कवडे, माणिक शिंदे, गोरख शिंदे, लक्ष्मण घाणेलु, अमोल शिंदे, गिरीराज शेरखाने, शिवसेना महिला शाखा प्रमुख माधुरी गायकवाड तसेच नीलकंठ सोनवणे यांनी सहभाग घेतला.सर्वांनी एकत्र येऊन अरविंद कटके यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. अखेरीस सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी विभागातील तसेच विभागाबाहेरील अनेक परिचित नागरिक उपस्थित होते.
स्व. अरविंद कटके यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली
RELATED ARTICLES