Saturday, August 23, 2025
घरमहाराष्ट्रसह्याद्री बँक निवडणुकीत सहकार पॅनलला अडीच हजार मताधिक्य -- नाना भिलारे

सह्याद्री बँक निवडणुकीत सहकार पॅनलला अडीच हजार मताधिक्य — नाना भिलारे

पळशी(अजित जगताप) : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचे लक्ष वेधून घेतलेल्या मुंबईतील कापड बाजार, माथाडी कामगार, हातगाडीवाले बांधव यांच्या श्रमातून उभी राहिलेल्या सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई या सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनल बँकेची प्रगती व प्रचारात आघाडी घेऊन सभासदांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. सोळा हजार बँकेचे सभासद असलेल्या या बँकेमध्ये निवडणुकीत किमान दोन ते अडीच हजार मताधिक्याने सहकार पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येतील. असा सार्थ विश्वास सहकार पॅनलचे कट्टर समर्थक नाना भिलारे यांनी अंबवडे फाटा ता. कोरेगाव येथे झालेल्या सभासद संवादाच्या बैठकीत केले.
कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक सभासद सह्याद्री सहकारी बँकेच्या वाटचालीचे साक्षीदार आहेत. आजही जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी उभे केलेल्या या बँकेबद्दल तरुण पिढ्यालाही अस्मिता आहे. याची चुणूक पाहण्यास मिळाली आहे. दिवाळी हा दीपोत्सव असतो. त्यापूर्वीच सह्याद्री बँकेच्या सभासदांनी दिव्यांचा आकाश कंदील प्रकाशमान केला आहे. अनेक सुज्ञ सभासदांनी सह्याद्री बँकेच्या विकासाबाबत समाधान व्यक्त केले. कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी, सोनके, नांदवळ वाघोली, दहीगाव ,देऊर, पळशी, सोळशी, जगताप नगर, अनपटवाडी, पिंपोडे बुद्रुक, सातारा रोड, नायगाव व इतर भागांमध्ये म्हणजे सातारा मतदान केंद्रात सुमारे तीन हजार सहाशे सह्याद्री सहकारी बँकेचे सभासद मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
गेल्या वेळेपेक्षा ही निवडणूक सोपी करण्यासाठी विरोधकांचा खोटे बोला, पण रेटून बोला… या नीतीमुळे चांगलाच हातभार लावलेला आहे . त्यामुळे सत्ताधारी सहकार पॅनलच्या बद्दल लोकांना विकास व पारदर्शक कारभाराची खात्री पटली आहे. कारण, काही विरोधकांचा सह्याद्री सहकारी बँकेशी काडीमात्र संबंध नाही. अशांचे नेतृत्व स्वाभिमानी व निस्वार्थी भावनेतून काम करणाऱ्या सभासदांना मान्य नाही. या आयात केलेल्या नेतृत्वाला घरपोच करण्यासाठी वैयक्तिक व घरगुती आणि इतर अडचणी बाजूला सारून आकाश कंदीलला मतदान करण्याचे कर्तव्य सभासद बजावतील असे छातीठोकपणाने श्री सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.
सह्याद्री बँकेच्या निवडणुकीच्या इतिहासाबाबत माहिती देताना कट्टर समर्थक नाना भिलारे यांनी सांगितले की, लहानपणापासून मुंबईमध्ये वास्तव्य असताना मुंबईतील कापड बाजार , कापड गिरणी, हातगाडी वाले, माथाडी अशा अनेकांचे मुंबईचे व सह्याद्री सहकारी बँकेचे योगदान पाहिलेले आहे. आज कांदिवली चारकोप येथील सह्याद्री नगर मधील सोन्यापेक्षाही जास्त मोलाची असलेली जागा बळकवण्यासाठी काही बिल्डर लॉबी या निवडणुकीत हस्ते पर हस्ते हस्तक्षेप करत आहे. ही गोष्ट अनेकांना खटकली आहे.
सह्याद्री बँक स्थापन करणाऱ्या अनेक मान्यवरांचा अवमान आहे. त्याचा सूड घेण्यासाठीच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आकाश कंदील चिन्ह म्हणजे खऱ्या अर्थाने सुख समृद्धी व विकासाचे तोरण आणि आनंदाचे व समाधानाचे चिन्ह म्हणून आकाश कंदील निवडले आहे. विजयी होणे एवढीच मर्यादित सभासदांची अपेक्षा नसून मताधिक्य वाढवण्यासाठी आता सभासदांनी ही निवडणूक हाती घेतल्याची माहिती बाळासाहेब कदम यांनी दिले आहे.
—- —– —— ——- ——— ——– —–

चौकट — सह्याद्री सहकारी बँकेच्या सहकार पॅनल साठी प्रत्येक सभासद महत्त्वाचा असल्यामुळे बँकेचे हितचिंतक तथा किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ललित मुळीक, अजय कदम, तुकाराम निकम, मधुकर यादव, राजेंद्र सकुंडे, संजय भिलारे, सुरेश निकम व अनेक मान्यवर आकाश कंदीलला विक्रमी मताधिक्य मिळावे व सहकार पॅनलचा नावलौकिक पुढील दहा ते पंधरा वर्षे कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याबद्दल पॅनल प्रमुख पुरुषोत्तम माने यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

______________________________
फोटो

— सह्याद्री बँकेचे कट्टर समर्थक नाना भिलारे

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments