सातारा (अजित जगताप) :
मानव मुक्तीचा लढा देणाऱ्या छत्रपती शंभुराजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट व सहकाऱ्यांच्या सहभागाने सातारा येथील गांधी मैदानावर बुधवार दि: १४ मे रोजी सायंकाळी पाच वाजता भिम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भिम फेस्टिवलची जोरदार तयारी झाली असून सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती शंभुराजे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सलग तिसऱ्या वर्षी हा भीम फेस्टिवल होत आहे.सर्वसामान्य माणसांना शिवकालीन सत्य इतिहास माहिती व्हावा .जाणून घ्यावा व आत्मचिंतन करावे .यासाठी या भिम फेस्टिवल चे आयोजन केले असून या ठिकाणी युगपुरुषांच्या सह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा होत आहे.
एक प्रकारे फुले- शाहू – आंबेडकर विचारांचा मेळा भरत आहे. पहिल्या वर्षी महिला भिमशाहिरा सीमा पाटील , जॉली मोरे दुसऱ्या वर्षी शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी तसेच या वर्षी भिम कन्या कडूबाई खरात यांच्या भिम गीताचा कार्यक्रमासह सोबतच बहुजन नायक छत्रपती शंभू राजांचा इतिहास पुन्हा एकदा शब्दरूपी मांडण्यासाठी प्रसिद्ध व्याख्याते व इतिहासाचे अभ्यासक श्री श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान होणार आहे.
या ऐतिहासिक व वैचारिक वारसा जपणाऱ्या भिम फेस्टिवल साठी प्रमुख उपस्थिती श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले. विशेष उपस्थिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ,पुनर्वसन व मदत मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि पर्यटन तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे,आमदार मनोज घोरपडे तसेच ज्येष्ठ कायदे तज्ञ अँड राजेंद्र गलांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे दिप प्रज्वल कराड दक्षिणचे लोकप्रीय आमदार मा. डॉ. अतुल भोसले यांचे हस्ते होणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भिम फेस्टिवल होत आहे. या भिम फेस्टिवलच्या यशस्वीतेसाठी सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे, जिल्हा महासचिव सुहास मोरे, युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखा सकटे, सुनीता येवले ,मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार ,आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष शंकरराव उईके, विद्यार्थी सेनेचे आशुतोष वाघमोडे. कोरेगाव तालुका अध्यक्ष पै. प्रशांत उबाळे, महाबळेश्वरचे अविनाश भोसले, सातारा तालुका अध्यक्ष पै. अभिजीत गायकवाड, कराडचे भागवत कांबळे, जावळीचे सूर्यकांत जाधव, युवती आघाडी जिल्हाध्यक्ष अँड पायल गाडे – जगताप, सातारा शहर अध्यक्ष पै. अजय पुलावळे आणि शहर उपाध्यक्ष पै. प्रमोद बोकेफोडे जिल्हा उपाध्यक्ष अनिल धोत्रे.आदी मान्यवर परिश्रम घेत आहेत.
सातारा शहरातील राजवाडा नजीक महात्मा गांधी मैदानावर सायंकाळी पाच वाजता या भिम फेस्टिवलला सर्व जाती धर्मातील आंबेडकर अनुयायांनी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी उपस्थित राहावे. असे नम्र आवाहन भिम फेस्टिवल नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे .