प्रतिनिधी : कराड अर्बन बँकेच्या सांगोला शाखेचे शाखाधिकारी आणि गुंफण अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांना अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे “साहित्यरत्न” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला.
या गौरवाबद्दल विविध क्षेत्रांतून डॉ. चेणगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे सहकारी, मित्र, कुटुंबीय आणि साहित्यप्रेमींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत, “हा पुरस्कार म्हणजे सांगोल्यासाठीही अभिमानाची बाब आहे,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
डॉ. चेणगे यांनी ‘गुंफण अकादमी’च्या माध्यमातून ग्रामीण भागात साहित्यप्रेम व सामाजिक जाण निर्माण करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची ही पावती म्हणून साहित्यरत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे.