Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रसावंतवाडी तालुक्यातील देवस्थानांत नवचंडी महायज्ञ सोहळा उत्साहात ; आयोजकांचे सर्वत्र कौतुक

सावंतवाडी तालुक्यातील देवस्थानांत नवचंडी महायज्ञ सोहळा उत्साहात ; आयोजकांचे सर्वत्र कौतुक

प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील देवसू-श्री देवी शेंडोबा माऊली मंदिर, दाणोली- श्री देवी लिंग माऊली मंदिर, केसरी-श्री स्वयंभु मंदिर देवस्थान या तीन गावचे देवस्थान एकच असून यावर्षी तीनही गावांमध्ये नवचंडी महायज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या तीनही मंदिरांमध्ये नवचंडी याग, दत्त याग, भजन कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम व तीनही दिवस दोन वेळचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आजुबाजूच्या पंचवीस गावांतील सिमधाड्यांच्या उपस्थितीत व हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. या नऊ दिवसांच्या उत्सवाला तिनही गावांत मिळून दहा ते पंधरा हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन तीनही गावच्या मानकऱ्यांनी केले होते. यामध्ये प्रमुख हनुमंत सावंत, विठ्ठल सावंत, बाळकृष्ण सावंत, भाई सावंत (मास्तर), सचिन सावंत, राजन सावंत, बाबा सावंत, लिंगोजी सावंत, शाम सावंत, जनार्दन जाधव, अरविंद सावंत, दिनेश सावंत, यशवंत सावंत, मकरंद सावंत यांनी हिरहिरीने भाग घेऊन कार्यक्रम उत्साहात यशस्वीपणे पार पाडला. आजही पंचक्रोषीत कार्यक्रमाच्या आयोजकांची वाखाणणी होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments