Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रबेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) श्री.भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागात बेघर हटविणेसाठीची कारवाई करण्यात आली

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील, दुर्गामाता नगर सेक्टर –08 बेलापूर, नवी मुंबई, येथे असलेल्या भुंखडावरील अनधिकृत झोपडया स्वत:हून हटविने आवश्यक होते. अे – विभाग कार्यालय बेलापूर मार्फत तोडक कारवाईचे आयोजन करुन, सदर भुखंडावरील 64 अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आलेल्या आहेत.

या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, अे विभाग बेलापूर येथील अधिकारी/ कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. सदर मोहिमेकरीता पोकलन-01, मजूर-22, वाहन आयचर-01, पिकअप-01, स्थानिक पोलिस तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments