सातारा(अजित जगताप ) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा पाया असं संबोधणाऱ्या तलाठी वर्गाचे काम योग्य पद्धतीने होत आहे. त्यामुळे महसूलची इमारत भक्कम उभी आहे. याची प्रचिती साताऱ्यात आली आहे. सातारा जिल्हा तलाठी संघटनेच्या वतीने सातारचे नूतन अतिरिक्त जिल्हा अधिकारी श्री मल्लिकार्जुन माने यांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने शासकीय महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये व्यस्त असताना सुद्धा तलाठी संघटनेला सन्मानाची वागणूक देऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री माने यांनी तलाठी संघटनेच्या कार्याचीच पोहोच पावती दिली. त्यामुळे तलाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांना चांगलेच प्रोत्साहन मिळाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठीशी शाब्बासकीची थाप म्हणजे खऱ्य अर्थाने पुरस्कार आहे. अशी भावना यावेळी अनेक तलाठ्यांनी व्यक्त केली
. यावेळी सातारा जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे, गणेश बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुहास अभंग धुमाळ, रावसाहेब सावंत, किशोर धुमाळ, सयाजी सावंत, पृथ्वीराज पाटील, संदीप वनवे, प्रशांत पवार व इतर तलाठी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
______________________________
फोटो– सातारचे नूतन अतिरिक्त जिल्हा अधिकारी श्री माने यांचे स्वागत करताना तलाठी संघटनेचे पदाधिकारी…. (छाया– अजित जगताप सातारा)
अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री मल्लिकार्जुन माने यांचे तलाठी संघटनेने केले स्वागत….
RELATED ARTICLES