तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य उल्लेखनीय आणि दिशादर्शक स्वरुपाचे आहे. असे गौरवोद्गार ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत आण्णा नाईक ही खलनायकाची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेले सुप्रसिध्द अभिनेते माधव अभ्यंकर यांनी काढले. ते लेंगरे, ता.खानापूर येथे निसर्ग फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळयासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा, प्रा.संजय ठिगळे, जीवन काटेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. यावेळी डाकवे यांनी स्पंदन ट्रस्ट ने राबवलेल्या उपक्रमांची माहिती माधव अभ्यंकर यांना दिली. या उपक्रमांच्या माहितीची ‘कर्तव्यमुद्रा’ नावाची छोटी पुस्तिका तयार केली असून ती पुस्तिका अभिनेते अभ्यंकर यांना देण्यात आली. त्या पुस्तिकेची बारकाईने पाहणी करत त्यांनी ट्रस्टला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर सुप्रसिध्द अभिनेते माधव अभ्यंकर यांना संदीप डाकवे यांनी स्वतः रेखाटलेले त्यांचे स्केच भेट दिले. या स्केचचे अभिनेते अभ्यंकर आणि व्यासपीठावरील मान्यवरांनी कौतुक केले. याप्रसंगी आ.सुहास बाबर यांना डॉ.संदीप डाकवे यांनी लिहलेले ‘तात्या’ हे पुस्तक भेट दिले.
काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासन, सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने ट्रस्टच्या कार्याची दखल घेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
स्पंदन ट्रस्ट चे कार्य उल्लेखनीय आणि दिशादर्शक : अभिनेते माधव अभ्यंकर
RELATED ARTICLES