कराड (विजया माने) : येवती ता. कराड येथील प्रतिष्ठित नागरिक आदर्श माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर तुकाराम शेवाळे उर्फ पोपट अण्णा यांचे वयाच्या 62 व्या वर्षी रविवार दि. ४ रोजी निधन झाले ,त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,पाच भाऊ ,चार बहिणी ,पुतणे, सुना, नातवंडे,असा मोठा परिवार आहे ,गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता , ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे ते सक्रिय सदस्य होते ,तर शिवतेज सामाजिक विकास संस्थेचे संचालक देखील होते ,लहानापासून ते थोरापर्यंत ते अण्णा या नावानेच परिचित होते .त्यांच्या या आकस्मित जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांचा आधारवडच हरपला आहे,परमेश्वर त्यांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो.रक्षाविसर्जन मंगळवार दिनांक ६ रोजी सकाळी ९ वा. येवती येथील वैकुंठ भूमीत होणार आहे .
येवती येथील प्रतिष्ठित नागरिक शंकर शेवाळे (पोपट अण्णा) यांचे निधन
RELATED ARTICLES