भोसे : वै.दत्तात्रय महाराज कळंबे नगरी सहकारी पतसंस्थेने दत्तात्रय कळंबे महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत कै. स. म. बेलोशे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली यशाचे अनेक टप्पे गाठले आहेत. पर्यटनस्थळांवर नव्याने दाखल झालेल्या पांचगणी शाखेने अल्पावधीत प्रगती साधली असल्याचे गौरवोद्गार जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी काढले.काटवली (दापवडी ) येथील कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या पांचगणी शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात पार पडला.
यावेळी वै.दत्तात्रय कळंबे महाराज आणी संस्थापक कै.सदाशिव बेलोशे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, व्हा. चेअरमन हरिश्चंद्र गावडे, ज्येष्ठ संचालक तुकाराम घाडगे , बाबुराव रांजणे,प्रकाश रांजणे, रामचंद्र रांजणे, भीमराव खरात, रामचंद्र बेलोशे, पांडुरंग शिंदे, हणमंत बेलोशे, वसंतराव बेलोशे, ॲड संजय जंगम, अभिजित खुरासने, संजय बेलोशे, दीपक बेलोशे, तानाजी रांजणे, संतोष बेलोशे, अंकुश मालुसरे, अरविंद कळंबे, सिकंदर बेलोशे, प्रवीण गुजर, अभय डोईफोडे, सुनील बेलोशे, गोपाळ बेलोशे , रामदास पार्टे, अशोक दुधाणे , किसन जाधव, विक्रम पोरे आदी मान्यवर तसेच सभासद उपस्थित होते.संस्थेचे ज्येष्ठ व संचालक माजी चेअरमन तुकाराम घाटगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी घाटगे म्हणाले, कै. दत्तात्रय महाराज कळंबे नागरी सहकारी पतसंस्थेच्या पांचगणी शाखेने एक वर्षात १ कोटीं १८ लाख रुपयेंचा ठेवीचा टप्पा गाठला असून २ कोटींचा एकत्रित व्यवसाय करीत प्रगती साधली आहे. संस्थेच्या मुख्य शाखा दापवडी येथे स्वमालकीच्या वास्तू, अत्याधुनिक संगणक, सीबीएस.सिस्टीम, लॉकर आदी सुविधा संस्था देत आहे.
चेअरमन रविकांत बेलोशे म्हणाले पांचगणी सारख्या पर्यटन स्थळावर संस्था चालवताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो अनेक आव्हाने असतानाही संस्थेने एक वर्षात समाधानकारक प्रगती साधली आहे. अशाच पध्दतीने सभासद, ठेवीदार यांनी आम्हाल साथ देत संस्थेला भरभराटी प्राप्त करून देऊयात असे आवाहन केले.
यावेळी व्यवस्थापक अनिल रांजणे , शामराव रांजणे, अजित बेलोशे, शंकर गोळे, रामदास गलगले, लक्ष्मण ओंबळे, प्रकाश रांजणे सुनिता राजपुरे तसेच शाखा प्रमुख, कर्मचारी, सभासद, ठेवीदार उपस्थित होते.
संस्थेच्या वर्धापन दिननिमित्त परिसरातील नागरिक आणी सहकारी, सभासद यांनी संस्थेस शुभेच्छा दिल्या. पांचगणी शाखा प्रमुख प्रकाश रांजणे यांनी प्रस्ताविक केले तर हरिश्चंद्र गावडे यांनी आभार मानलेसोबत फोटो आहे.
पांचगणी : वर्धापन दिनानिमित प्रतिमा पूजन करताना तुकाराम घाडगे, प्रकाश रांजणे, बाबुराव रांजणे व इतर
कै.दत्तात्रय कळबे महाराज पतसंस्थेची अल्पावधीत प्रगती थक्क करणारी : राजेंद्र शेठ राजपुरे ; पांचगणी शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात
RELATED ARTICLES