Monday, June 23, 2025
घरमहाराष्ट्रस्नेहज्योतचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र कांदिवलीत ; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाला...

स्नेहज्योतचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र कांदिवलीत ; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाला शुभारंभ

प्रतिनिधी : दिव्यांगाच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र कांदिवलीत सुरु करण्यात आले असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झाले या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. समाजातील दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ही संस्था अतिशय पायाभूत कार्य करत आहे. बोरिवली येथील श्रीकृष्ण नगर मधील एका छोट्याशा जागेतून आपले दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचविणाऱ्या स्नेहज्योतचे आणखी एक दिव्यांग पुनर्वसन केंद्र अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कांदिवली पूर्व येथे सुरू झाले आहे. स्नेहज्योत चे प्रामाणिक कार्य आणि दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात स्नेहज्योतने केलेल्या योगदानाने प्रभावित होऊन ज्येष्ठ उद्योगपती व समाजसेवक श्री पियुष शहा यांनी गुंडेचा इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व येथील एक जागा स्नेहज्योतच्या कार्यासाठी देऊ केली. पियुष शहा यांच्या हस्ते फीत कापून एका छोटेखानी कार्यक्रमात स्नेहजोतच्या या कांदिवली युनिटचे उद्घाटन झाले. दिव्यांग जगदीश जयस्वाल याला व्यवसायासाठी श्री पियुष शहा यांच्या तर्फे वीजेवर चालणारी तीन चाकी सायकल देण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ प्रोफेसर डॉक्टर हेमंत शिंदे ,उषा बांठिया तसेच उद्योजक व समाजसेवक श्री प्रदीप शहा हे मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या सचिव सुधाताई वाघ, अध्यक्ष अपर्णा कायकिणी आणि खजिनदार श्री मिलिंद तेंडुलकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व ऋणनिर्देश केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे ट्रस्टी विजय कळमकर यांनी केले. कांदिवलीच्या या नवीन जागेत लवकरच दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि कौन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचा स्नेहज्योतचा मानस आहे. दिनांक 5 मे ते 15 मे या दरम्यान स्लो लर्नर मुलांसाठी विशेष समर कॅम्प स्नेहज्योतने याच जागेत आयोजित केला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी 9820639230/ 7977001783 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments