Sunday, June 22, 2025
घरमहाराष्ट्रधारावी बचाव आंदोलनाची अतिमहत्त्वाची जाहीर सभा – १ मे रोजी शिवराज मैदानात

धारावी बचाव आंदोलनाची अतिमहत्त्वाची जाहीर सभा – १ मे रोजी शिवराज मैदानात

धारावी : १ मे २०२५ – धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने एक अतिमहत्त्वाची जाहीर सभा गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, एन. शिवराज मैदान, संत कक्कया मार्ग, क्रॉस रोड, मुन्सिपल शाळेजवळ, धारावी, मुंबई १७ येथे आयोजित करण्यात आली आहे.

“धारावी आमच्या हक्काची, नाही अदानीच्या बापाची” या घोषवाक्याखाली आयोजित या सभेमध्ये धारावीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली नागरिकांना त्यांच्या हक्काच्या जमिनीतून उचकटून बाहेर काढण्याचे षड्यंत्र सुरू आहे. अनेक आंदोलने आणि पत्रव्यवहार करूनही प्रशासन आणि संबंधित विकासकांकडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

सभेतून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर मागणे, एकजुटीचा संदेश देणे आणि प्रशासनावर दबाव आणणे हे प्रमुख उद्दिष्ट असेल. “एक काठी सहज तुटते, पण लाकडाची मोळी तुटत नाही” या गोष्टीप्रमाणे, धारावीच्या नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे, अन्यथा डम्पिंग ग्राऊंडवर पाठवले जाण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

धारावीतील सर्व माय, बाप, भाऊ, बहिणींनी या सभेस उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे. यासाठी धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक माजी आमदार बाबुराव माने यांनी गेले दोन दिवस सपूर्ण धारावीत टेम्पोच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments