Monday, June 23, 2025
घरमहाराष्ट्रबिरुदेव डोणे हा मेंढरामागे फिरून नाही तर कठोर परिश्रम करून आयपीएस

बिरुदेव डोणे हा मेंढरामागे फिरून नाही तर कठोर परिश्रम करून आयपीएस

यमगे (विजया माने):- जिद्द , चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर ‘यश’ हे तुमच्या समोर हात जोडून उभे रहाते. यश हे मेंढरामागे फिरुन नाही तर अभ्यास करून मिळवता येते हे आयपीएस झालेल्या बिरू डोणे यांनी सिद्ध करून दाखवले, असे यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे म्हणाले. ते बिरदेव डोणे यांचा संघटनेच्या वतीने यमगे येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. ते पुढे म्हणाले की हल्ली यु पी एस सी, एमपीएससी, करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे हि समाधान देणारी बाब असली तरीही अभ्यास करणारी कमी परंतु आई वडिलांच्या पैशावर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करण्याच्या नावाखाली पुणे दिल्ली यासारख्या शहरात राहुन मौज मजा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
देशभरातून लाखो मुले परिक्षेला बसतात परंतु यश मात्र कठोर परिश्रम, अभ्यास करणाऱ्या बिरदेव सारख्या थोड्याच विद्यार्थ्यांना मिळते. अन आय पी एस किंवा आय ए एस, अशी पदे मेरिटनुसार पटकावतात. बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि आयपीएस पद पटकावले.
बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा हुशार परंतु घरची परिस्थिती बेताची बिरदेव चा एक भाऊ आर्मी नोकरीस आहे. बिरदेव ने सिव्हिल इंजिनिअरिंग करून नोकरीच्या मागे न लागता प्रांजल चोपडे, अक्षय सोलनकर या मित्रांच्या सहकार्याने युपीएससी परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला अखेर यश मिळाले आणि बिरदेव डोणे युपीएससी च्या परीक्षेत ५५१ व्या क्रमांकाने आयपीएस झाला. जेव्हा ही बातमी प्रांजल चोपडे यांनी दिली तेव्हा बिरू हा बेळगाव येथे मेंढरांच्या तळावर गेलेला होता. त्यामुळे मिडीयावर मेंढरं राखणारा बिरु आयपीएस झाला व्हायरल झाले. परंतु बिरूने पुणे दिल्ली येथे राहुन कठोर परिश्रम करून हे यश मिळवले आहे. मेंढरं राखून नाही. आयपीएस झालेल्या बिरूकडून गोरगरीब मुलांना प्रेरणा मिळाली आहे. गरीब परिस्थिती असली तरीही जिद्द चिकाटी च्या जोरावर यश मिळवता येते.परिस्थिती शिक्षणाच्या आडवी कधीच येत नाही. हे बिरूने पुन्हा एकदा दाखवून दिले.
बिरू चा आदर्श घेऊन कठोर परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्या मुलं पुन्हा आत्मविश्वासाने स्पर्धा परिक्षेत यश मिळवतील हे मात्र नक्की.
यावेळी संजय वाघमोडे यांनी बिरदेव ला भारतीय संविधान व आजपर्यंत सर्व सामान्य मेंढपाळ,धनगर वाडे, यांच्या समस्या, मेंढपाळ व सर्व सामान्यांच्या पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केलेल्या बातम्या, यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देलेली निवेदने, इत्यादी बातम्यांचे संकलन करून त्याचे (मेंढपाळ व धनगर वाड्यावरचं जगणं मरणापरास वाईट) हे पुस्तक तयार करून भेट म्हणून दिले. व बिरदेव यांना विनंती केली आपण जेव्हा अधिकारी म्हणून कार्यभार हाती घ्याल तेव्हा भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून सर्व सामान्य माणसांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली. व बिरदेव ने सर्व संकलन केलेले पुस्तक पाहून ती मान्य केली.
सत्कार समारंभास यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय वाघमोडे, जिल्हासंपर्क प्रमुख सुनिल शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, जिल्हा उपाध्यक्ष, अमोल मेटकर, जिल्हा संघटक पिंटु गावडे, राधानगरी तालुका संपर्क प्रमुख राम देवणे, हातकणंगले तालुका प्रमुख यशवंत वाकसे, यशवंत क्रांती बुठार शाखेचे, मिलींद अनुसे बिरू अनुसे अनिल अनुसे, मिणचे शाखेचे आनंदा वाकसे, सर्जेराव वाकसे, मिणचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुमार घाटगे, भुदरगड तालुक्यातील फये शाखेचे भागोजी मलगोंडा, रामू मलगोंडा, विठ्ठल मलगोंडा, इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments