Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रघाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५५ वा कला व क्रीडा महोत्सव !

घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५५ वा कला व क्रीडा महोत्सव !

मुंबई- चेंबूरच्या घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा ५५ वा कला व क्रीडा महोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे.त्यानिमित्त गुरुवार १ मे रोजी महाराष्ट्र दिनी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर आणि चेंबूर नागरिक सहकारी बॅंकेच्या संचालिका मीनाक्षी पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाचा यंदाचा कला व क्रीडा महोत्सव गेल्या महिनाभरापासून सुरु आहे.आतापर्यंत विविध क्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या असून १ मे रोजी महापूजा आयोजित केली आहे.यादिवशी समुह नृत्य स्पर्धा आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होणार आहे. मंडळाचे आधारस्तंभ प्रसिद्ध कला-दिग्दर्शक बबन काटवटे हे असून या मंडळाला उद्योजक के.आर.गोपी,डेकोरेटर विलास पाटील,मनोज पाटील,आशिष पाटील, भूषण पाटील आणि महेंद्र पांचाळ यांचे विशेष सहकार्य लाभत असते.तरी परिसरातील नागरिकांनी या महापूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रोहित पाटील,सेक्रेटरी भालचंद्र पाटील व खजिनदार चारुदत्त ठाकूर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments