प्रतिनि : कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या जयवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल, जुळेवाडी आणि मा.आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून साळशिरांबे ता.कराड येथे मोफत सर्वरोग आयुर्वेद निदान व आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.
कार्यक्रमाचे उदघाटन कराड दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष मा.श्री.प्रविण साळुंखे यांच्या हस्ते पार पडले, यावेळी डॉ.संग्राम पवार, साळशिरंबे गावातील माजी उपसरपंच मा.श्री.वसंतराव मोहिते (डेपोटी), माजी उपसरपंच मा.श्री.जयवंतराव यादव (आबा), भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष श्री.पंकज पाटील, श्री.राजेंद्र पाटील, बुथ अध्यक्ष मा.तानाजी पवार, श्री.हणमंत पाटील, श्री.सुभाष चवरे, श्री.हणमंत यादव, डॉ.युवराज पाटील, श्री.दत्तात्रय पाटील, मा.गणेश यादव, श्री.गणेश साठे, मा.विराज पाटील, मा.आकाश पाटील, सुमित पाटील व गावातील जेष्ठ ग्रामस्थ, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.