Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रबांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न

बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) : शासकीय वसाहत,बांद्रा (पूर्व) येथे शनिवार, दि. २६ एप्रिल २०२५ रोजी गव्हर्नमेंट कॉटर रेसिडेन्शियल असोसिएशन यांनी सरकारचे आभार मानण्यासाठी तसेच सन्मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे आभार मानण्यासाठी मोठ्या उत्साहात कर्मचाऱ्यांची सभा पार पडली.
या सभेला मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.गेल्या दोन पिढ्या येथे कर्मचारी राहत असून सरकारची सेवा करत आहेत.येथील कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा उपोषणे ही केली होती,अनेक वर्षापासून येथील कर्मचारी स्वतःच्या मालकीची घरे मिळण्यासाठी लढा देत आहेत.तसेच माजी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत अनेक बैठका करण्यात आल्या होत्या.कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेण्यात आला आणि बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना भूखंड देण्यात येत आहे,यावर शिक्कामोर्तब झाला व शासन निर्णय काढण्यात आला.तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी येथील कर्मचाऱ्यांना शब्द दिला होता की, येथील कर्मचाऱ्याने शासकीय वसाहत बांद्रा येथेच स्वतःची मालकीचे घर मिळतील आणि हे काम एका बाळासाहेबांच्या शिवसैनिकांने पूर्णत्वास नेण्याचे काम केले,असे पावसकर यांनी आपल्याभाषणात स्पष्ट केले.तसेच महाराष्ट्र राज्याचे सन्मा. उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेबांचा आपल्याला निरोप आहे, हे काम करून पूर्णत्वास न्यायचे आहे.त्यासाठी एकजूटीने रहा,काम करा.अर्हता व निकषासाठी गठीत होणा-या समितीत चर्चेच्या अनुषंगाने आपले आतापर्यंत कार्यरत अधिकारी/कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी व वारसाहक्क यांची प्रतवारीनुसार माहिती तयार करा.याच अनुषंगाने जेवढे लाभ घेता येतील त्याचा अभ्यास करा.
असोसिएशनच्या अध्यक्षांनी श्री.एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बांद्रा वसाहतीतील कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मालकीची घरे मिळवून देण्यासाठी कामाला चालना व गती दिल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून साहेबांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले.या सभेला सन्मा.पावसकर साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार साहेबांचे सर्व कर्मचाऱ्यांकडून आभार मानण्यात आले. या सभेला कर्मचारी मोठ्या संख्येने कुटुंबासहित उत्साहाने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments