प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक २०२४ पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपेल मात्र तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे,मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार हे दोन्ही शिवसेनेचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहत आहेत.त्यामध्ये शिवसेना शिंदे गट मधून विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे तिसरी टर्म निवडणूक लढवत आहेत,तर शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार अनिल देसाई हे प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत,ते राज्यसभेचे सदस्य होते,संघटनात्मक जबाबदारी सांभाळणारे व्यक्तिमत्व,सुशिक्षित,सुसंस्कृत उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत. दक्षिण मध्य मुंबई मध्ये काँग्रेसचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मतदार संघात आमदार व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांचेच वर्चस्व असणार आहे. धारावीतील वॉर्ड १८३ मध्ये आज शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार अनिल देसाई यांची प्रचार रॅली होती,यावेळी त्यांच्यासोबत वर्षाताई गायकवाड स्वतः प्रचारात आघाडीवर होत्या.
यावेळी शिवसेना, काँग्रेस,शेकाप,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.