Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रमानवता भावनेतून महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सव स्थगितीसाठी हिंदुत्ववादी संघटनेची मागणी.....

मानवता भावनेतून महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सव स्थगितीसाठी हिंदुत्ववादी संघटनेची मागणी…..

महाबळेश्वर(अजित जगताप) : संपूर्ण भारत देश पहलगाम पर्यटकांच्या हत्येमध्ये दुःख सागरात बुडाला आहे. अशावेळी मानवता भावनेतून महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सव स्थगित करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे. त्याला वाढता पाठिंबा मिळत आहे.महाबळेश्वर येथे देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व अनधिकृत बांधकाम आणि धन लांडग्याची तिजोरी भरण्यासाठी हा महोत्सव असल्याची टीका सामान्य कष्टकरी करत आहेत. या महोत्सवाला स्थानिक भूमिपुत्रांनी आवाज उठवल्यानंतरच बचत गट, स्थानिक कारागीर यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु दुःखद प्रसंगी आनंद उत्सव साजरा करणे योग्य नाही. त्या ऐवजी हा महोत्सव पुढे घेतला तर काही बिघडणार नाही. असं विश्व हिंदू परिषदेचे जितेंद्र वाडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत . यासाठी अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली आहे.जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी २२ एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निरपराध भारतीय हिंदू पर्यटकांवर गोळीबार करून हल्ला चढवला. यामध्ये पर्यटकांच्या आरक्षणासाठी मुस्लिम युवक सुद्धा बळी गेला आहे. याची आम्हाला दुःख आहे. या हल्ल्याचा प्रथम विश्व हिंदू परिषद निषेध व्यक्त करते .एकीकडे पर्यटनासाठी केलेल्या पर्यटकांवर गोळीबार होतो.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर येथे २ मे ते ४ मे रोजी होणाऱ्या महा पर्यटन महोत्सव रद्द करून किमान पंधरा दिवस दुखावटा पाळावा. अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे सातारा शहर मंत्री जितेंद्र वाडेकर , हेमंत सोनवणे, कोल्हापुरे , रवी कोठावळे यांनी केली आहे.
पहलगाम येथे निसर्ग पर्यटनासाठी गेलेले नवविवाहित व सहकुटुंब गेलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून २६ जणांना जीव गमावावा लागला.त्यांच्या मृत्यूने देशभर शोककळा पसरली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर एक मे महाराष्ट्र दिन १०९ हुतात्म्यांच्या आठवणी काढल्या जातात. हुतात्म्यांवर सुद्धा अशाच पद्धतीने गोळीबार झाला होता.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पर्यटन ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने दोन मे ते चार मे दरम्यान जो महापर्यटन महोत्सव आयोजित केला आहे. हा महा पर्यटन महोत्सव पेहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलावा. किंवा शक्य झालं तर रद्द करावा कारण याच्यामुळे सर्वसामान्य माणसांना अडचणी निर्माण होणार आहे. आतापासूनच वाहतुकीत बदल केल्यामुळे सर्वसामान्य महाबळेश्वर वासीय त्रस्त झालेले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व सातारा जिल्हा स्थानिक प्रशासनाने मानवता भावनेतून हा महा पर्यटन महोत्सव स्थगित करावा. अन्यथा इतिहासामध्ये मानवता शून्य महोत्सव अशी नोंद होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
हिंदू समाजामध्ये मृत्यूनंतरचा हा अंतिम विधी महत्त्वाचा असताना त्याच कालावधीमध्ये महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव घेणे म्हणजे दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या हिंदू पर्यटकांचा हा अवमान आहे. ज्यांचे जळते त्यांनाच कळते. या प्रमाणे एखाद्याच्या घरी मृत्यू झाल्यास त्याला भेट देण्यासाठी अनेक नामवंत जातात. त्यांच्या सांत्वन करतात तर दुसऱ्या बाजूला असा महोत्सव घेणे कितपत योग्य आहे? चे आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
_________________________________________
फोटो — हिंदू हत्याबाबत निवेदन देताना विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते व महाबळेश्वर मधील पर्यटकांची गर्दी (छाया – निनाद जगताप महाबळेश्वर)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments