मुंबई : सुरभि श्याम गौशाला भगवती सेवा समिति (रजि.) यांच्या वतीने एक भव्य धार्मिक व सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीधाम वृंदावन येथील परम पूज्य श्री अनंतानंद जी महाराज (अनंत श्री विभूषित, श्रीमद् जगतगुरु द्वाराचार्य श्री अग्रपीठाधीश्वर आणि मलूकपीठाधीश्वर परम पूज्य श्री राजेंद्रदास देवाचार्य जी महाराज यांचे कृपापात्र शिष्य) यांच्या पावन उपस्थितीत श्रीमद् भागवत कथा व १०८ मूल पारायण होणार आहे.
हा दिव्य कार्यक्रम १५ मे २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत, माहेश्वरी प्लॉट, योगी नगर, बोरिवली पश्चिम, मुंबई – ४०००९२ येथे पार पडणार आहे.
श्रीमद् भागवत कथा ही सनातन धर्मातील एक महत्त्वपूर्ण परंपरा असून ती धर्माच्या मूल्यांचा प्रसार आणि भावी पिढ्यांपर्यंत अध्यात्मिक संदेश पोहोचवण्याचे काम करते. “सर्वे भवंतु सुखिनः, सर्वे संतु निरामयाः” या तत्वज्ञानावर आधारलेली ही कथा मानव सेवा आणि गोसेवा यासारख्या मूल्यांना अधिक गहिराईने समजून घेण्यास मदत करते.
या उपक्रमाची माहिती देण्यासाठी २५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजता एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात येत आहे.
मुख्य आयोजक सुरभि श्याम गौशाला भगवती सेवा समिति (रजि.) यांच्या वतीने करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बालमुकुंद गट्टानी, इंदल सिंह, ऋषिकेश दुबे, रामेश्वर डागा (योगेश्वर धाम मंदिर, योगी नगर), अभिषेक जाजू (स्वस्ति श्री त्रिवेणी फाउंडेशन संयोजक)
हा कार्यक्रम समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल मीडिया, प्रेस व स्थानिक माध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. महाराज श्रींच्या कृपेमुळे हा अध्यात्मिक सोहळा मुंबईत एक नवीन अध्याय घडवेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.