Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रआरोग्यसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी वासंतिक क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन....

आरोग्यसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी वासंतिक क्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन….

प्रतिनिधी(विजया माने) : श्री मळाईदेवी शिक्षण संस्था मलकापूर संचलित आ.च.विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला.

क्रीडा प्रशिक्षण विषयीचे मनोगत डॉ.नवनाथ तुपे व प्रशिक्षणाचे प्रशिक्षक अल्लाबक्ष पटेल यांनी व्यक्त केले. शिबीर तेही पूर्णपणे मोफत देणारी श्री मळाईदेवी शिक्षण संस्था एकमेव शिक्षण संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.
हॉलीबॉल गोल्ड मेडल प्राप्त खेळाडू कुमारी मनीषा राठोड हिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कराडचे पोलीस उपनिरीक्षक मा.अजरुद्दीन शेख यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील संस्काराची शिदोरी जीवनामध्ये नेहमी उपयोगी कशी पडते याची विविध उदाहरणे दिली.यासाठीच श्री मळाईदेवी शिक्षण संस्था नेहमीच प्रयत्नशील असते.विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा प्रशिक्षणमध्ये पौष्टिक नाष्टाही दिला जातो.
या कार्यक्रमासाठी श्री. मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री अशोकराव थोरात, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अरुणा कुंभार, उपमुख्याध्यापक श्री ए .बी .थोरात पर्यवेक्षक श्री.बी.जी.बुरुंगले,आदर्श ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख सौ शिला पाटील, कराडचे पोलीस कॉन्स्टेबल मा.श्री संभाजी प्रकाश जाधव, विद्यार्थी सर्व शिक्षक पालक इ. मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जे.एन. कराळे,सौ एस.टी.कांबळे, डी.एस.शिंदे,सौ.एम.एम.लिंबारे,सौ उर्मिला थोरात,सौ सविता पाटील,आर.ए.माने, राजेंद्र पांढरपट्टे शरद तांबवेकर यांनी शिबिराचे नियोजन केले.
क्रीडा शिबीरासाठी अल्लाबक्ष पटेल, गौरी सिंग,उज्वला रैनाक, संजय गरुड, प्रियांका पानवल,राहुल विरकर,सोपान इनामदार,संजय राठोड,हेमंत शिर्के,राहुल परिहार, सारंग थोरात,गजानन कुसुरकर, श्रीहरी यादव,प्रशांत गुजर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सौ ज्योती शिंदे यांनी मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments