प्रतिनिधी : राष्ट्रीय चर्मकार संघाचा महामेळावा धारावीतील मनोहर जोशी महाविद्यालयात येत्या शनिवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे,अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई अध्यक्ष विलास गोरेगांवकर यांनी दिली.
या महा मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मुंबई प्रदेश समितीने केलेले आहे.या महामेळाव्यात प्रथमतः संत शिरोमणी गुरु रविदास,वीर कक्कया महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न घटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ,माता फातिमा शेख या महामानव आणि महामातांचा संयुक्त जयंती उत्सवही साजरा करण्यात येणार आहे.
या महामेळाव्यात ‘संविधानाचा ‘प्रचार आणि प्रसार’ यावर दलित चळवळीचे अभ्यासक प्रबुद्ध साठे आणि ज्येष्ठ विचारवंत आशालता कांबळे हे यावेळेस आपले परखड विचार मांडणार आहेत.
या राज्यव्यापी मेळाव्यास छत्रपती संभाजीनगर, परभणी,लातूर ,नांदेड,हिंगोली, नागपूर,चंद्रपूर,अकोला,अमरावती ,बुलढाणा,पुणे,सातारा,सांगली,सोलापूर, अहिल्यानगर,कोल्हापूर, नासिक,धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड,पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरवात झालेली आहे.
मोची,जैस्वार,चांभार,ढोर,होलार, मादिगा, जाट (पंजाब,आंध्र) आदी शे सव्वाशे जाती चर्मकार समाजात देशभर विखुरलेल्या आहेत.या सर्व समाज बांधवांना या महामेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आणण्यात येणार आहे,असे राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी सांगितले.
या महामेळाव्यात कश्मीर – पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मांडण्यात येणार आहे.यानंतर दादागिरीच्या जोरावर गोरगरीब चर्मकार बांधवाच्या जमिनी-मालमत्ता आजही धनदांडग्यांकडून गावा गावात लुटल्या जात आहे. याविरोधात आवाज उठविणारा जमिन-घर बळकाव विरोधी ठराव, चर्मकार समाजातील माता भगिणींवरील अत्याचारास विरोध करणारा ठराव असे इतर दोन ठराव मांडून या ठरावांवर नामवंत वक्ते आपले विचार मांडून आपल्या समाज बांधवांना मार्गदर्शन करतील.
तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुधाताई जोगदंड,बाबुराव सोनवणे,रमाकांत नारायणे,राजाभाऊ शिंदे,शहाजीराव भाऊसाहेब सातपुते,पत्रकार दगडू माने या मान्यवरांना राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे या महा मेळाव्यात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या मेळाव्या निमित्त आंबेडकरी विचारांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार असून हा विचारांचा अंगार शाहीर राजेश शिर्के हे फुलविणार आहेत.तर भिमराज की बेटी फेम दिक्षा शिर्के यांच्या ऑर्केस्ट्रा,मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या संयुक्त जयंती सोहळ्यास राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामभाऊ कदम, सूर्यकांत गवळी,मिराताई शिंदे, अॅड नारायण गायकवाड, विठ्ठल व्हनमोर, अशोक देहरे, शारदाताई नवले,कवी विलास देवळेकर,ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवलकर,माजी अध्यक्ष कैलास आगवणे,उपाध्यक्ष रावण गायकवाड,श्रीकांत शेट्ये,रामदास कांबळे,जगन्नाथ वाघमारे,रमेश हंकारे,राजेंद्र बावीसकर,गोविंद खटावकर,तानु आंबेकर,विठ्ठल जवादे,जगन्नाथ खाडे,अॅडव्होकेट अरविंद जैस्वार,विठ्ठल निंबोळकर,परशुराम इंगोले,डाॅ.सुभाष कोरी,आबासाहेब पतंगे,मंगलाताई गवळी आदी प्रमुख मान्यवरांसह समाजाच्या सर्व स्तरातील लोक यावेळेस उपस्थित राहणार आहेत.